एक क्षण थांब जरा
एक क्षण थांब जरा येईल आठवांना पूर शोधून ही कधी जर नाही मिळाला सुर एक क्षण थांब जरा येईल आठवांना पूर जगताना..झगडताना रोजच्या दिवसाशी लढताना दमशील...थकशील सुखांना जोडताना तेव्हा स्वप्ने मिठीत असू दे नको जाऊ देऊ दूर एक क्षण थांब जरा येईल आठवांना पूर नियमाने जगणं जगतो आपण उन्हासोबतच सावली असते तरी प्रकाशाकडे धावताना ही मनाची प्रतिमा फसते कधी आनंदाला उधाण कधी क्षणी स्वप्न चूर एक क्षण थांब जरा येईल आठवांना पूर तुझं हे नेहमीचचं करशी विचार वेगळा तुझ्या सुखांना अन् दुःखांनाही आहे कलेचाच लळा तुझ्या वेदनांना सुखाचा स्पर्श कसा करु ? वास्तव हे जवळ अन् स्वप्न दूर एक क्षण थांब जरा येईल आठवांना पूर हे धावणे रोजचेच आता असंख्य स्वप्नांपाठी कधी मी तुझ्यासाठी कधी तु माझ्यासाठी धावताना का मनी उठे हे काहूर ? एक क्षण थांब जरा येईल आठवांना पूर दिवास्वप्न नाही हे वास्तवाचे भान आहे जुळवा-जुळव नात्यांची जिथे भावनेला मान आहे रेशमाची बंधने ही उरो प्रीतीचेच सुर एक क्षण थांब जरा येईल आठवांना पूर तु दिली...