Posts

सूर्यफूलं

सूर्यफूलं  🌻 दुःखाला उपकार नसतात.. हिमतीनं सगळं सावरलं तरी, वेदनेचा दंश शब्दांना पोसतो  मनाला कितीही आवरलं तरी.. हा दंश हवा असतो पुन्हा पुन्हा अंशतः मन बधिर करण्यासाठी. जशी ‘विन्सेंट’ ची सूर्यफूलं गाऊ लागतात.. अंधाराला भेदून सुर वाहू लागतात.. प्रकाशाची आर्त चित्र रंगवण्यासाठी.. गावं तेंव्हा एखाद गाणं गहिवरलं तरी. ______________________ DrSushama Daberao  #मराठीकविता #मराठी #मराठीलेखणी #मराठीस्टेटस #instadaily #kavita #कविता #poetrycommunity #मराठीसाहित्य ##marathi #marathikavita #maharashtra

सदाफुली

Image
डायरीच्या बंद पानांआड .. मंद हसत असते .. ही सदाफुली .., तुझ्या अमर्याद प्रेमाला  आत साठवून.. कित्येक गुलाब आणि चाफे फिके पडले .. तुझ्या ह्या नाजुकश्या फुलासमोर.. तुझ्या निष्पाप चेहऱ्यावरचं स्मित... कधीही मिटू नये म्हणून, सदा मिटून घेते सगळे अंधार.. आणि फुलते तुझ्या प्रेमकिरणांच्या स्पर्शाने... साद देते , साथ देते .. ही  सदाफुली.. ✍️ डॉ.सुषमा #मराठीकविता  #मराठी  DrSushama Daberao

एक क्षण थांब जरा

Image
एक क्षण थांब जरा येईल आठवांना पूर शोधून ही कधी जर नाही मिळाला सुर एक क्षण थांब जरा येईल आठवांना पूर जगताना..झगडताना रोजच्या दिवसाशी लढताना दमशील...थकशील सुखांना जोडताना तेव्हा स्वप्ने मिठीत असू दे नको जाऊ देऊ दूर  एक क्षण थांब जरा येईल आठवांना पूर नियमाने जगणं जगतो आपण उन्हासोबतच सावली असते तरी प्रकाशाकडे धावताना  ही मनाची प्रतिमा फसते कधी आनंदाला उधाण कधी क्षणी स्वप्न चूर एक क्षण थांब जरा येईल आठवांना पूर तुझं हे नेहमीचचं करशी विचार वेगळा तुझ्या सुखांना अन् दुःखांनाही  आहे कलेचाच लळा तुझ्या वेदनांना सुखाचा  स्पर्श कसा करु ? वास्तव हे जवळ अन् स्वप्न दूर  एक क्षण थांब जरा येईल आठवांना पूर हे धावणे रोजचेच आता  असंख्य स्वप्नांपाठी कधी मी तुझ्यासाठी  कधी तु माझ्यासाठी धावताना का मनी उठे हे काहूर ? एक क्षण थांब जरा येईल आठवांना पूर दिवास्वप्न नाही हे वास्तवाचे भान आहे  जुळवा-जुळव नात्यांची जिथे भावनेला मान आहे रेशमाची बंधने ही उरो प्रीतीचेच सुर एक क्षण थांब जरा येईल आठवांना पूर तु दिली...

स्मृती

Image
स्मृती रंग -रंग कल्पना रंगविती मज मना रांगत-रांगत येती जीव लागे पणा संगतीत तयांच्या रंगांत रंगते मी स्वार स्वप्न पंखांच्या नाहीच भंगते मी भासे हे विश्व मज रंगाविष्कार कुंचल्यांचा 'कलाकार' आहे खरा 'कलाकार' या जगाचा नकळत अंतरंगी फिरतात विविधाकृती पंखांनी कुंचल्यांच्या उडतात विविधाकृती लाभावी मज एक घडावी चमत्कृती रंगांची - ढंगांची पण गाजावी ती स्मृती डॉ.सुषमा