सूर्यफूलं 🌻 दुःखाला उपकार नसतात.. हिमतीनं सगळं सावरलं तरी, वेदनेचा दंश शब्दांना पोसतो मनाला कितीही आवरलं तरी.. हा दंश हवा असतो पुन्हा पुन्हा अंशतः मन बधिर करण्यासाठी. जशी ‘विन्सेंट’ ची सूर्यफूलं गाऊ लागतात.. अंधाराला भेदून सुर वाहू लागतात.. प्रकाशाची आर्त चित्र रंगवण्यासाठी.. गावं तेंव्हा एखाद गाणं गहिवरलं तरी. ______________________ DrSushama Daberao #मराठीकविता #मराठी #मराठीलेखणी #मराठीस्टेटस #instadaily #kavita #कविता #poetrycommunity #मराठीसाहित्य ##marathi #marathikavita #maharashtra
Comments
Post a Comment