स्मृती


स्मृती

रंग -रंग कल्पना
रंगविती मज मना
रांगत-रांगत येती
जीव लागे पणा

संगतीत तयांच्या
रंगांत रंगते मी
स्वार स्वप्न पंखांच्या
नाहीच भंगते मी

भासे हे विश्व मज
रंगाविष्कार कुंचल्यांचा
'कलाकार' आहे खरा
'कलाकार' या जगाचा

नकळत अंतरंगी
फिरतात विविधाकृती
पंखांनी कुंचल्यांच्या
उडतात विविधाकृती

लाभावी मज एक
घडावी चमत्कृती
रंगांची - ढंगांची
पण गाजावी ती स्मृती

डॉ.सुषमा

Comments

  1. The King Casino | Situs Judi Slot Online Terbaik 2021
    Play 토토 사이트 코드 online Pragmatic Play https://septcasino.com/review/merit-casino/ Slots at The King Casino wooricasinos.info - Member Baru & Terpercaya 2021! Rating: filmfileeurope.com 98% · https://septcasino.com/review/merit-casino/ ‎240,388 votes

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सूर्यफूलं

एक क्षण थांब जरा