सदाफुली
डायरीच्या बंद पानांआड ..
मंद हसत असते ..
ही सदाफुली ..,
तुझ्या अमर्याद प्रेमाला
आत साठवून..
कित्येक गुलाब आणि चाफे फिके पडले ..
तुझ्या ह्या नाजुकश्या फुलासमोर..
तुझ्या निष्पाप चेहऱ्यावरचं स्मित...
कधीही मिटू नये म्हणून,
सदा मिटून घेते सगळे अंधार..
आणि फुलते तुझ्या प्रेमकिरणांच्या स्पर्शाने...
साद देते , साथ देते ..
ही सदाफुली..
✍️ डॉ.सुषमा
#मराठीकविता #मराठी
DrSushama Daberao
Comments
Post a Comment